केज/प्रतिनिधी
केज शहरातील संविधान चौक येथे संविधान दिन साजरा करण्यात आला आहे.
सर्वप्रथम केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांच्या हस्ते संविधान चौकास पुष्पहार अर्पण करण्यात आले व उपस्थित मान्यवरांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले तर सविधान दिनाचे औचित्य साधून युवकांचे प्रेरणास्थान कालकथीत सुमेध बप्पा शिंदे यांच्या चौकास पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष सौ.सीताताई बनसोड यांनी सर्व नागरिकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या पुढे बोलताना बनसोड म्हणाल्या की, भारतीय संविधान दिन हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे भारतीय संविधानावर संपूर्ण देश चालत आहे भारतीय संविधानामुळेच लोकशाही जिवंत आहे व भारतीय संविधानामुळे सर्व नागरिकांना जगण्याचा बोलण्याचा अधिकार दिला आहे. जगातील सर्वात उत्कृष्ट संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहे म्हणून आपण आज स्वाभिमानाने जगत आहोत व मी नगराध्यक्ष पदावर आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त संविधानामुळेच आहे असे बोलताना त्यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड, बालासाहेब शेटे, लहू जाधव, पत्रकार तात्या गवळी, विवेक बनसोड, वंचितचे शरद धीवार, टाकळी ग्रामपंचायतचे सदस्य जीवन सीरसट, सुमेध बप्पा शिंदे विचार मंचाचे अध्यक्ष किरण जोगदंड, उपाध्यक्ष प्रेम मस्के, राहुल इनकर, मोसिन शेख, सुहास समुद्रे, संतोष जावळे, सोनू जोगदंड, समाधान बचुटे, पत्रकार प्रदीप गायकवाड, अशोक धीवार, ओम शिनगारे, सुरज वैरागे, संदेश ताकतोडे, अक्षय जगताप, पत्रकार भागेश अन्नदाते यांच्यासह सुमेध बप्पा शिंदे विचार मंचाचे पदाधिकारी उपस्थित होते.









Leave a Reply