*केज येथील पत्रकार बांधवांच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा*

 

 

केज/प्रतिनिधी

 

केज येथील पत्रकार बांधवांच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भीमशक्ती संघटनेचे मराठवाडा संघटक चंद्रकांत खरात सर तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते सुभाष सोनवणे, माजी अध्यक्ष बाबासाहेब मस्के, वंचितचे ज्येष्ठ नेते धनराज सोनवणे, वंचितचे युवा नेते शरद धीवार, आरपीआयचे राहुल सरवदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संविधानाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्व उपस्थित पत्रकार बांधवांनी वंदन केले.

यावेळी पत्रकार प्रतिनिधी म्हणून गौतम बचुटे व रंजीत घाडगे यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थितांना संविधानाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

सुभाष सोनवणे यांनी संविधानाची प्रस्तावना वाचून संविधानाचे महत्त्व सांगितले.

अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना चंद्रकांत खरात सर यांनी सांगितले की, संविधान दिन का साजरा करायचा व संविधान दिनाचे महत्त्व काय यावर त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी पत्रकार रामदास तपसे, रमेश इतापे वसंत सोनवणे, महादेव काळे, तात्या गवळी, रंजीत घघाडगे, बापू वैरागे, गौतम बुचुटे, प्रदीप गायकवाड, बालासाहेब जाधव संजय खळगे सनी शेख, विनोद पवार, महादेव गायकवाड यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक महादेव काळे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास तपसे यांनी केले उपस्थितांचे आभार बापू वैरागे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!