*सरस्वती महाविद्यालयात संविधान दिन साजरा* *गावोगावी संविधानाचे पारायण होणे आवश्यक — डॉ.हनुमंत सौदागर*

 

 

 

केज दि २६(प्रतिनिधी)

भारताच्या विकासासाठी, प्रत्येक व्यक्तीच्या हक्क आणि कर्तव्यासाठी आणि भारतीय लोकशाहीला अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने भारतीय संविधान समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करणे आवश्यक आहे. यासाठीच प्रत्येक गावात भारतीय

संविधानाचे पारायण होणे आवश्यक असल्याचे मत डॉ हनुमंत सौदागर यांनी व्यक्त केले. ते सरस्वती महाविद्यालयात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ जी.बी.पाटील,

प्रा डॉ रमेश माने,प्रा डॉ नागेश कराळे,प्रा डॉ मधुकर चाटे,प्रा डॉ पठाण वाय पी,प्रा डॉ सारिका बुरगे,प्रा डॉ सीता केंद्रे,प्रा डॉ अर्चना वाघमारे,डॉ वैशाली आहेर,रा.से.यो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ संतोष मस्के, प्रा डॉ सुरेश आरडले, प्रा डॉ कल्याण वराळे,प्रा डॉ हरिदास शिंदे,प्रा अशोक घोडके,शिक्षेकेत्तर कर्मचारी अविनाश गालफाडे,

लक्ष्मीकांत शेळके,श्री मस्कर,

शेख आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना ते म्हणाले

भारतीय संविधानाने विविधतेने नटलेल्या भारताला एकतेत बांधण्याचे काम केले आहे. भारतीय संविधान म्हणजे भारताच्या प्रत्येक नागरिकाला मिळालेली अमुल्य अशी देणगी आहे.

यावेळी संविधान उद्देश पत्रिकेचे सामुदायिक वाचन करून २६ /११ मधील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्तविक

डॉ मस्के यांनी केले.आभार

प्रा किरणकुमार धिमधीमे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!