*स्वानंद सार्वजनिक वाचनालयात भारतीय संविधान दिन उद्देशिकेचे वाचन करून संपन्न*

 

केज/ प्रतिनिधी

स्वानंद सार्वजनिक वाचनालय, आनंदगांव ता. केज. जि. बीड. येथे 26 – 1 l – 2024 रोजी सकाळी I l वाजता भारतीय संविधान॥ उद्देशिकेचे सामुहिक वाचन॥ ग्रंथालयाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष, जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक, ख्यातनाम वक्ते व व्याख्याते वसुदेव( बप्पा) गायकवाड यांच्या अध्यक्षते खाली मोठ्या उत्साहात करण्यात आले.

या वेळी सवप्रथम भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन व वंदन करण्यात आले.

संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन कार्यक्रमात माजी सरपंच रामराजे गायकवाड, रमेशआबा गायकवाड, कमलाकर साबळे, रावसाहेब जाधव, रविंद्र गायकवाड ( पेंटर), रंजीत पाटील, हरिओम गायकवाड, ह.भ.प. नारायण भाऊ गायकवाड, नारायण भोगजकर, बबन पुंड, श्रुती पुंड, ज्ञानेश्वरी पुंड, शौर्य गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, कृष्णा गिरी यांचासह ग्रंथालयाचे उपाध्यक्ष मुरलीधर शिंदे, सचिव छायाताई सोमवंशी, सहसचिव ज्ञानोबा भोगनकर, सदस्या सुमनताई गायकवाड, ग्रंथालयाचेच आनंद( भैय्या) गायकवाड यांनी सामुहिक भारतीय संविधान॥ उदेरीकेचे सामुहिक वाचन” केले.

त्यानंतर 26 ./ 1। हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वहाण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन ग्रंथालयाचे आनंद( भैय्या) गायकवाड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!