*नाभिक समाजाच्या शैक्षणिक वैभवात मानाचा तुरा.*

 

 

केज! प्रतिनिधी

 

केज तालुक्यातील नाभिक समाजातील श्री अण्णासाहेब भगवानराव काळे यांचे चिरंजीव, श्री.गोविंद अण्णासाहेब काळे (Software Engineer ) यांची फ्रँकफर्ट,जर्मनी (Germany) येथील नामांकित IT कंपनी या ठिकाणी निवड झाली. त्यानिमित्त नाभिक समाज बांधव व समाज संघटना केज तालुका व शहर यांच्या वतीने सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी नाभिक संघटनेचे केज तालुका अध्यक्ष श्री.नवनाथराव टोपे, माजी अध्यक्ष श्री.अनंतराव राऊत, शहर अध्यक्ष मनोज काळे ,युवक अध्यक्ष श्री अविनाश काळे, तालुका संघटक श्री. अशोक पवार, किरण कुलकर्णी (देवा) यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

गोविंद काळे यांचा शैक्षणिक प्रवास खूप बिकट परिस्थितीमध्ये झाला,10,वी नंतर त्यांनी पुढील इंजिनिअरिंग चे शिक्षण पुण्यातून पूर्ण केले आणि अभियांत्रिकी (Bachelor of Engineering) करून Wipro,Accenture आणि Tata Technology अश्या नामांकित कंपनी मध्ये काम करून त्यांना जर्मनी याठिकाणी संधी मिळाली आणि त्यांना युरोप येथील BLUE CARD देखील मिळाले आहे.सध्या ते सहपत्नी सौ.सोनम शरदराव मोटेगावकर यांच्यासोबत जर्मनी याठिकाणी वास्तव्यास आहेत,त्यांचा सामान्य कुटुंबातील हा प्रवास नाभिक समाजातील विद्यार्थ्यांसाठी खूप मोलाचा व आदर्श घेण्यासारखा आहे.

 

चौकट……

 

गोविंद यांचे मनोगत :-

 

गोविंद यांच्या प्रवासात त्याच्या परिवाराचे व सल्लागारांचे मोलाचे योगदान आहे,खडतर प्रवासात जिद्द, चिकाटीच्या आणि मेहनतीच्या जोरावर त्यांना यशाचे शिखर गाठता आले, यावेळी असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!