महात्मा ज्योतीबा फुले स्मृती दिना निमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

स्वामी दयानंद प्रतिष्ठान केज व राजर्षी शाहू विद्या मंदिर केज तर्फे आयोजीत-
महात्मा ज्योतिबा फूले स्मृती दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
*—————————————–*
चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना बळ देण्याचं काम संस्थेने केले- *लक्ष्मणराव बेडसकर*
*============================*

*केज! प्रतिनिधीदि

दि,३० नोव्हेंबर-* स्वामी दयानंद प्रतिष्ठान केज व राजर्षी शाहू विद्या मंदिर केज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय व उपक्रमशिल कार्य करणाऱ्या शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. केज येथील गटसाधन केंद्राच्या सभागृहात दि. ३० नोव्हेंबर वार शनिवार रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत हर्षोत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष मा.श्री.राहुल राजेसाहेब देशमुख अध्यक्ष- स्वामी दयानंद प्रतिष्ठान केज तर प्रमुख पाहुणे म्हणून केजचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी मा.श्री.लक्ष्मणराव बेडसकर तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये मा.श्री.जी.बी.गदळे सर सचिव, स्वामी दयानंद प्रतिष्ठान केज तसेच श्रीमती चाटे बी.बी मुख्याध्यापिका राजर्षी शाहू विद्या मंदिर केज यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज व शेतकऱ्यांचा कनवाळा असणारे,शिक्षणाचा प्रचार करणारे समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फूले यांना अभिवादन करण्यात आले.यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय संस्थेचे सचिव श्री.जी.बी.गदळे यांनी दिला.यावेळी संस्थेच्या व शाळेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची थोडक्यात माहिती सांगितली.

कार्यक्रमाच्या पुढील सञात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व सत्कारमुर्तींचा शाल,पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये-

प्रा.डॉ.नवनाथ गंगाधर काशिद बाबुरावजी आडसकर महाविद्यालय केज,श्री.हरिदास अर्जुन शिंदे सरस्वती महाविद्यालय केज, श्री.सय्यद जफर सय्यद जाकेर, जि.प.प्रा.शा.अल्लाउद्दीन नगर केज,श्री.अनंत निवृत्तीराव गवळी, कानेश्वर विद्यालय कानडी माळी,श्री.शिवकुमार सोमनाथ कोरसळे, जि.प.कें.प्रा.शा.लहुरी.

सत्कार वितरण सोहळ्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात सत्कारमूर्ती प्रा.डॉ.नवनाथ काशिद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.भेंडीच्या बाबतीत संशोधन करून भेंडीमधील फायबर व तिचा हिरवा रंग जास्त दिवस राहावे यासाठी त्यांना पेटंट मिळाले आहे यासाठी त्यांचा सत्कार झाला.विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांनी नेहमी जाणून घेण्याच्या प्रक्रियेत राहीलं पाहिजे जिज्ञासूपणे गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत.शैक्षणिक माध्यमातून पुरस्कार मिळणे आनंददायी आहे असं ते म्हणाले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक गटशिक्षणाधिकारी मा.श्री.लक्ष्मणराव बेडसकर यांनी शैक्षणिक, सामाजिक परिस्थितीचे वास्तव विद्यार्थ्यापुढे मांडले.आपल्या परिसरात सामाजिक उपक्रमांची कमतरता आहे अशा परिस्थितीत स्वामी दयानंद प्रतिष्ठान कडून राबविण्यात येणारे उपक्रम हे शिक्षकांना बळ देण्याचं काम करतात असे प्रतिपादन त्यांनी केले. चांगले काम करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचं महत्वाच काम आपल्या माध्यमातून होत आहे अशा उपक्रमात माझी तुम्हाला नेहमीच साथ असेल असं ते म्हणाले.

याप्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष राहुल देशमुख म्हणाले, आजच्या सर्व आदर्श शिक्षकांनी पुढील आयुष्यामध्ये विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी अजूनही अथक परिश्रम घेऊन कार्य केले पाहिजे.पुरस्कार प्राप्त सर्वांचे अभिनंदन करत त्यांनी उपस्थिती बद्दल सर्व मान्यवरांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे प्रेरणादायी सुञसंचलन श्री.हनुमंत घाडगे यांनी केले तर आभार शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री.विष्णू यादव यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.देशमुख ए.डी,श्री.क्षीरसागर आर.एस,श्री.डिरंगे जी.बी,श्री.मस्के जे.आर,श्रीमती जाधव मॅडम व श्रीमती गायकवाड मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले.यावेळी विद्यार्थी,पालक व हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!