मौजे सासुरा ता. केज येथे दत्त जयंती निमित्त गोकुळ उगले यांच्याकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन.
केज! प्रतिनिधी
सासुरा ता.केज येथील गोकुळ उगले यांनी स्वखर्चातून उभारलेल्या दत्त मंदिरात दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे यामध्ये दि.७-१२-२४ रोजी सकाळी रुद्राभिषेक व अखंड हवन प्रज्वलन तसेच दुपारी ५-०० वाजता श्री गुरुचरित्राचे सामूहिक पारायण संकल्प ,व पूजा दि.९-१२-२४ रोजी सकाळी १०-०० दत्तयाग व दत्तमाला मंत्राच्या आहुतीचे आयोजन केले आहे दि.१४-१२-२४ रोजी सकाळी ६-०दत्तगुरुंना अभिषेक व आरती१० ते १२ह.भ.प.श्री केशव महाराज गीते शास्त्री (एकनाथ महाराज मठ संस्थान सासुरा) यांचे सुश्राव्य कीर्तन व दुपारी १२-०० नंतर महाप्रसाद.
संध्याकाळी ६-०० दत्तगुरूंचा अवतार सोहळा, पाळणा गीत, फटाक्याची नयनरम्य आतिषबाजी व आरती संध्याकाळी ७-०० वाजता दत्त भक्तांना सेवा करत असताना आलेल्या स्व अनुभवाचे कथन, रात्री ८-०० ते ११ वेळेस गोपीचंद शास्त्री महाराज (गणेश नाथ आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था सासरा) यांचे सुश्राव्य कीर्तन होईल यादरम्यान सकाळी ७-३० ते८-०० या वेळेत दत्तप्रभू ची आरती होईल. तरी वरील कार्यक्रमास उपस्थित राहून महाप्रसादाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान गोकुळ उगले व परिवार सासुरा त्यांनी केले आहे.









Leave a Reply