*लक्ष्मी मुंडे नर्सिंग काॅलेज मध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महा परिनिर्वाण दिन संपन्न.*

 

 

केज/प्रतिनिधी

 

केज शहरापासुन जवळच बीडरोडवर असलेल्या लक्ष्मी मुंडे नर्सिंग काॅलेज मध्ये शुक्रवारीसकाळी विश्वरत्न महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करुन त्यांचा ६८ वा महा परिनिर्वाण दिन संपन्न झाला.यावेळी प्राचार्य रवि पवार,शिक्षक,कर्मचारी आणि विद्यार्थिनी, विद्यार्थी उपस्थित होते.केज शहरा पासुन जवळच असलेल्या बीड रोडवरील सिध्दी विनायक शैक्षणिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत (बापू) मुंडे यांनी सुरु केलेल्या लक्ष्मी मुंडे नर्सिंग काॅलेजमध्ये विश्वरत्न महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महा परिनिर्वाण दिनानिमीत्त दि.६ डिसेंबर शुक्रवार रोजी सकाळी लक्ष्मी नर्सिंग काॅलेजचे प्राचार्य रवि पवार सर यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे महत्व सरांनी उपस्थितांना सांगीतले.यावेळी शिक्षक व कर्मचारी सोनवणे ताई विद्यार्थीनी आणि विद्यार्थी उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!