पाच वर्षांच्या वियानाला सोबत नेत आ. नमिता मुंदडा यांनी घेतली आमदारकीची शपथ ;
“सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आईच्या भावना व्यक्त.
=======================
केज!प्रतिनिधी
पाच वर्षांपूर्वीची ती सकाळ अजूनही माझ्या मनात कोरलेली आहे. गर्भवती अवस्थेत, हृदयात असंख्य स्वप्नं, भीती आणि अनेक जबाबदाऱ्या घेऊन मी पहिल्यांदा विधिमंडळाच्या दाराशी उभी होते. माझ्या पोटात वाढत असलेल्या छोट्या जीवाने मला त्या क्षणाला आधार दिला, जणू तिच्या स्पंदनातून ती म्हणत होती,”आई, तू हे करू शकतेस !” अशा भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत केज मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी एका आईच्या भावनांना वाट मोकळी करून दिली
केज विधानसभेत विजय मिळवल्यानंतर आ नमिता मुंदडा या आमदारकीची शपथ घेण्यासाठी विधानभवनाकडे निघाल्या त्या आपली लेक वियानाला घेऊन ; चेहऱ्यावर समाधान व सोबत असलेल्या चिमुकलीचा अभिमान घेऊन शपथविधीनंतर त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त होत व्यक्त केलेल्या भावना प्रत्येक आईला अभिमानाची आसवे डोळ्यात आणणारी आहेत
आज पाच वर्षांनंतर तीच माझी चिमुकली कन्या वियाना आता पाच वर्षांची झाली आहे. तिच्या छोट्या हातात हात धरून पाच वर्षानंतर पुन्हा एकदा मी शपथविधिच्या निमित्ताने विधिमंडळाच्या दारात उभी आहे. हा क्षण माझ्यासाठी एक आमदार म्हणूनच नव्हे तर एक आई म्हणून खूप आनंददायी आहे.
तिच्या डोळ्यांत माझ्याबद्दलचा अभिमान पाहून माझं हृदय भरून आलंय. तिच्या लहानशा हातांनी माझं बोट घट्ट धरलेलं पाहून वाटतंय – संघर्षाचा प्रत्येक क्षण, त्यागाचं प्रत्येक पाऊल सार्थ ठरलं. असल्याच्या एका आईच्या भावना आ नमिता मुंदडा यांनी व्यक्त केल्या आहेत.









Leave a Reply