नरेंद्रजी मोदी परिचारिका प्रशिक्षण संस्था केज यांनी समुह लेकनृत्य प्रकारात पटकवला प्रथम क्रमांक.

*नरेंद्रजी मोदी परिचारिका प्रशिक्षण संस्था केज यांनी समुह लोकनृत्य प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला*
———————————————————————————
केज!प्रतिनिधी.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड, जिल्हा परिषद बीड, नेहरू युवा केंद्र बीड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय क्रीडा संकुल बीड येथे दिनांक 4 /12/ 2024 व 5 /12 2024 रोजी संपन्न झाल्या .यामध्ये बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ केज संचलित साने गुरुजी निवासी माध्यमिक विद्यालय केज व मा.श्री नरेंद्रजी मोदी परिचारिका प्रशिक्षण संस्था (GNM) केज येथील युवक युवतींनी सहभाग नोंदवून समूह लोकनृत्य यामध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला असून सदरील स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थी कु. साक्षी कराड,गित्ते शामसुंदर,आडे शिल्पा, चौरे प्रांजली, कांबळे साक्षी, मोरे चैताली, काळे राजनंदिनी, पवार ऋतुजा, बगाडे सचिन, फुंदे प्रांजली होते. सत्यम सरवदे हे लोकनृत्य मार्गदर्शक असून या सर्वांना प्रा.डॉ.कविताताई गित्ते मॅडम ॲड .उद्धवराव (अण्णा )कराड साहेब, श्रीमती.शेख मॅडम,श्री.चाटे सर,श्रीमती.जोशी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच कविता लेखन व कथा लेखन या संकल्पना आधारित कला प्रकारात कु.साक्षी उद्धवराव कराड हिने द्वितीय क्रमांक पटकावला तर वकृत्व स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक कु.साक्षी उद्धवराव कराड यांनी पटकाविला असून सदरील संघाचे व विद्यार्थ्यांचे विभागीय स्तरासाठी निवड झाली असून सर्व युवक युवतींना बीड जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर साहेब, संस्थेचे अध्यक्ष ॲड.उद्धवराव अण्णा कराड साहेब, उपाध्यक्ष राजेश कापसे साहेब, विद्यालयाच्या प्राचार्य डॉ.कविताताई गित्ते/कराड मॅडम, यांनी विभाग स्तरीय स्पर्धेसाठी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

सोबत:- फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!