वकीलवाडी प्रशांत नगर येथे दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी
केज!प्रतिनिधी
वकीलवाडी प्रशांत नगर या भागामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये दत्त जयंती साजरी करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात आले प्रत्येक वर्षी या भागातून वेगवेगळे विविध असे उपक्रम राबवले जातात आशा माध्यमातून मोठ्या प्रमाणातअन्नदान केले जाते तसेच विद्यार्थ्यांना कधी वह्या पुस्तक वाटप, कधी सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्याकरिता सन्मानचिन्ह वाटप करुन तर कधी महिलांकरिता खेळ पैठणीचा असे विविध सामाजिक उपक्रम या भागामध्ये सतत राबवले जातात महामानवांच्या जयंती असतील गणेश उत्सव असेल किंवा मकर संक्रांतीच्या निमित्त महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल आशा कार्यक्रमांमध्ये या भागातील सर्व नागरिक एकत्रित येऊन असे उपक्रम राबवतात यावर्षीही दत्त जयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन करून शेकडो भाविक भक्तांना या ठिकाणी अन्नदान करण्यात आले या दत्त जयंतीच्या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी या भागातील सर्व मित्र परिवार व महिलांचाही मोठा प्रतिसाद होता. प्रत्येक वेळेस वेगवेगळे सामाजिक उपक्रम या भागामध्ये राबवले जातात तेव्हा या भागातील मित्र परिवारांचे नागरिकांकडून कौतुक होते.
वकीलवाडी प्रशांत नगर येथे दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी.









Leave a Reply