*विक्रमराव मुंडे पोदार लर्न स्कूल,केज येथे आयोजित विविध क्रिडा स्पर्धा संपन्न..!*
*पाच दिवसीय क्रिडा स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग..*
केज ! प्रतिनिधी
*केजच्या विक्रमराव मुंडे पोदार लर्न स्कूल येथे पाच दिवसीय वार्षिक क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेच्या पहिल्या दिवसी विद्यार्थ्यांनी शहरातील धारुर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी केजच्या नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड, गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण बेडसकर,पत्रकार विनोद शिंदे,व्यापारी सूर्यकांत चवरे,व्यापारी धनराज पुरी व वैद्यनाथ बँकेचे व्यवस्थापक श्री. डी.एन. बरदाळे यांच्या शुभहस्ते ज्योत प्रज्वलित करत क्रिडा स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी आदर्श कोचिंग क्लासेस धारूरचे संचालक श्री.नितीन शुक्ला,एमबीबीएस ऑफिसर सुधाकर शेळके,कृष्णा अर्बन बँकेचे सिईओ वासुदेव मुंडे यांची उपस्थिती होती.दरम्यान केज शहरात विद्यार्थ्यांनी काढलेलेल्या मशाल रॅलीने केज वासियांचे लक्ष वेधून घेतले होते.*
*केज शहरातील विक्रमराव मुंडे पोदार लर्न स्कूल येथे पाच दिवसीय वार्षिक क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.दरम्यान पाच दिवस चाललेल्या क्रिडा स्पर्धेत विविध प्रकारचे खेळ घेण्यात आले.यामध्ये विक्रमराव मुंडे पोदार लर्न स्कूलचे सर्व विद्यार्थी,विद्यार्थ्यांनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत क्रिडा क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कौशल्य दाखवले.स्पर्धेच्या सांगतेला शिक्षण विस्तार अधिकारी सुनील केंद्रे,बनसारोळा गावचे सरपंच अजित गोरे,एस,बी,आय बँकेचे शाखाधिकारी आदित्य गाजरे,विश्वनाथराव कराड विद्यालयाच्या प्राचार्या माधुरीताई मुंडे यांच्या शुभहस्ते विद्यार्थांना बक्षिस (मेडल) वितरण करण्यात आले.त्यानंतर त्यांनी स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.दरम्यान क्रिडा क्षेञात विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या कलागुणां बद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.विक्रमराव (बप्पा) मुंडे,संस्थेचे सचिव श्री.अतुल (दादा) मुंडे,उपाध्यक्ष श्री.विजयकांत (भैय्या) मुंडे,प्राचार्या माधुरीताई मुंडे,शाळेच्या प्राचार्या अभिलाषा सारंगदेवत,उपप्राचार्य राहुल पवार सर, श्रीमती राधा भंन्साळी,श्री.सुहास काळे सर,श्री.धनंजय मस्के सर,श्री.राजु शेळके सर,श्री.अमर शिंदे सर,श्रीमती.शुभांगी सगरे मॅडम,श्रीमती.अश्विनी गलांडे मॅडम, श्रीमती.कविता मॅडम श्रीमती.सुमया अतार मॅडम,श्रीमती.झीनत शेख मॅडम श्रीमती.घोळवे मॅडम श्रीमती.रत्नगीता पाटील मॅडम श्रीमती दीपाली राजमाने मॅडम श्रीमती.तेजश्री सगरे मॅडम श्रीमती.शितल काळे मॅडम श्रीमती.अश्विनी सावंत मॅडम अंजुम शेख मॅडम श्रीमती.प्रणिता वाघमारे मॅडम तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी श्री.गणेश काळे श्री.शरद चवरे श्रीमती.अदिती पाटील मॅडम श्री.अनिकेत पाटील सेवक दिपक सुकाळे तसेच सर्व दिदी व ड्राइवर यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.कार्यक्रमाचे सुत्र संचालन दिशा भुतडा व यशवर्धन मुंडे यांनी केले.तसेच क्रीडा शिक्षिका श्रीमती.अंकुरवाड मॅडम यांनी विषेश परीश्रम घेतले.*









Leave a Reply