*माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या कार्यकर्त्यांनी सजग रहावे केज तालुका अध्यक्ष रमेश गुळभिले*

 

 

केज! प्रतिनिधी

 

 

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर, कार्याध्यक्ष शेखर कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली व बीड जिल्हा अध्यक्ष अजय भांगे यांच्या नेतृत्वाखाली शासकीय विश्रामगृह केज येथे दिनांक 22 डिसेंबर रोजी माहिती अधिकार महासंघाची बैठक रमेश गुळभिले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी बोलताना अध्यक्ष रमेश गुळभिले म्हणाले की मी माहिती अधिकार महासंघाचा केज तालुका अध्यक्ष म्हणून गेल्या दोन वर्षांपासून काम करत आहे व पुढील 2026 पर्यंत मी अध्यक्ष म्हणून जी माझ्यावर जबाबदारी आहे ती मी माहिती अधिकार फेडरेशन ची संपूर्ण आटी,नियम, व आचारसंहिता यांचे पालन करुन हा पदभार जबाबदारीने काम करत आहे करत राहील तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या केज तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सजग रहावे वेळोवेळी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करावे असेही सांगितले .या वेळी बीड जिल्हा अध्यक्ष अजय भांगे, जिल्हा उपाध्यक्ष सुदेश सिरसट, जिल्हा संपर्क प्रमुख सनी शेख,जिल्हा संघटक मुबशीर खतीब , तालुका प्रचारक दशरथ चवरे, तालुका उपाध्यक्ष प्रेमजीत हजारे,शहर अध्यक्ष अशोक गायकवाड , ता. सचिव खरात व तालुक्यातील सर्व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!