नमिता मुंदडा यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून लोक पुन्हा त्यांना संधी देणा !
केज! प्रतिनिधी
केज विधानसभा मतदारसंघात आता जसी मतदानची तारीख जवळ येत आहे त्तसी भाजपा महायुतीच्या उमेदवार आ नमिता अक्षय मुंदडा यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतलेली दिसत आहे. लोकांशी ठेवलेला संपर्क आणि त्यांच्याशी अखंडपणे सुरू असलेला संवाद तसेच विविध विकास कामांसाठी आणलेल्या भरघोस निधीमुळे आणि त्यामधुन झालेल्या विविध विकास कामांमुळे याबरोबरच महिलांसाठी राबवलेल्या लाडकी बहिण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे व वयोवृद्धांसाठी तिर्थक्षेत्र योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे भाजप माहायुतीच्या उमेदवार आ. सौ. नमिता मुंदडा या जनतेच्या मनात राज्य निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत. त्यांचा सोज्वळ स्वभाव व जनतेचे म्हणणें ऐकून घेऊन त्यावर तात्काळ तोडगा काढून सांगितलेले काम मार्गी लावण्याच्या वृत्तीमुळे आ. नमिता मुंदडा यांनी इतर उमेदवारांना केज मतदारसंघातून खुप मागे टाकले आहे. समाजसेवक तसेच भाजपचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा काकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप महायुतीचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात त्यांच्या प्रचारासाठी कामाला लागले आहेत. लोकनेत्या पंकजा मुंडे, माजी खासदार प्रितमताई मुंडे यांची भक्कम साथ असल्यामुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवार नमिता मुंदडा यांची केज मतदारसंघात हवा निर्माण झाली असून त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे अशी मतदारसंघातून सगळिकडे चर्चा ऐकायला मिळत आहे. गावागावात त्यांच्या समर्थकांची मोठी फळी पहायला मिळत आहे. नमिता मुंदडा यांच्या कार्यकुशलतेमुळे मतदारसंघात त्यांची लोकप्रियता चांगलीच वाढलेली आहे म्हणून ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर होत आहे. जनता विकासाला पाहून मुंदडा कुटुंबाला पुन्हा पुढील पाच वर्षांसाठी आमदारकीची संधी देणार असल्याचे वातावरण पाहायला मिळत आहे.











Leave a Reply