केज! प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली( माळी) येथील भूमिपुत्र डॉ. किशोर दळवे यांनी एमजीएम युनिव्हर्सिटी संभाजीनगर या विद्यापीठाची मानाची पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
डॉ. किशोर दळवे यांनी बीबीए, एमबीए (एच आर) एमबीए (आर ए बी एम); एमसीए या पदव्या विविध विद्यापीठाकडून प्राप्त केल्या असून असून नुकतेच त्यांना मॅनेजमेंट सायन्स या विषयात पीएचडी ही पदवी दि.३१-१२-२०२४ रोजी एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सपकाळ सर यांच्या हस्ते देऊन विद्यापीठाच्या विशेष कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
त्यांना डॉ.प्रवीण शास्त्री सरांचे मार्गदर्शन लाभले असून या पदवीदान कार्यक्रमास ईतर मार्गदर्शक व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ.किशोर दळवे त्यांचा सत्कार करण्यात आला त्यांच्या या यशामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्यांचे अभिनंदन मुख्यतः पुढील पदाधिकारी, नातेवाईक व सहकारी यांनी केले आहे यात, दैनिक दिव्य लोकप्रभाचे संपादक संतोष मानूरकर, सौ.आशा दळवे; डॉ. दया पाटिल ;डॉ. कोरडे सर ;श्री बाबुराव दळवे;श्री दगडू भाऊ दळवे; श्री महादेव दळवे;श्री अशोक मिरगे श्री.वसंतभाऊ कातळे,श्री शिवाजीराव जाधव,श्री अशोक तारळकर तसेच त्यांचा मित्रपरिवार व सहकारी, पत्रकार बांधव यांचा समावेश आहे.









Leave a Reply