केज चे भुमिपुत्र अमजदोद्दीन खतीब यांना बीड येथे आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने केले सन्मानीत.

बीड येथे द स्कूल एक्सप्रेस, आविष्कार कोचिंग क्लासेस, युनिक अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न

केजचे भूमिपुत्र अमजदोदिन मुम्ताजोदिन खतीब यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने केले सन्मानित.

केज/प्रतिनिधी

बीड येथे द स्कूल एक्सप्रेस, आविष्कार कोचिंग क्लासेस, युनिक अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न झाला आहे.
केजचे भूमिपुत्र तथा मौलाना आझाद उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आमजदोदिन मुम्ताजोदिन खतीब यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
बीड येथील द स्कूल एक्सप्रेस, आविष्कार कोचिंग क्लासेस, युनिक अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श मुख्याध्यापक, शिक्षक, आरोग्य विभाग यासह इतर क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या गुणवंतांना पुरस्कार जाहीर करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डि.जी . तांदळे तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.आ.सय्यद सलीम डॉ.नरेंद्र काळे,मा. संजय पंचगल्ले मा चंद्रकांत शेळके, शेख तय्यबभाई, समंदर खान, भगवानराव सोणवने, नानाभाऊ हजारे, उत्तमराव पवार रंजित क्षिरसागर, खुर्शीद आलम,दत्ताजी नलावडे ,शेख एजाजभाई, पत्रकार तात्या गवळी,खतीब, संपादक,आशोक नागरगोजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे आयोजकांच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला, यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. आयोजकाच्या वतीने सर्व सत्कारमूर्तींना पुष्पगुच्छ ट्रॉफी व सन्मान पत्राची फोटो फ्रेम देऊन सन्मानित करण्यात आले.
शेवटी खंडागळे सर यांनी आभार मानले. यावेळी सामाजिक,राजकीय, शैक्षणिक, आरोग्य सेवेतील, पत्रकारिता यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!