तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा.- विनोद गुंड.
केज /प्रतिनिधी
युवा कार्य एवं खेल मंत्रालय,भारत सरकार नेहरू युवा केंद्र बीड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड,बीडजिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ केज यांच्या संयुक्त विद्यमाने केज तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२४-२५ आयोजन करण्यात आले आहे.तरी केज तालुक्यातील वय वर्ष १५ ते २९ वयोगटातील युवक सांघिक व वैयक्तिक खेळात सहभागी होऊ शकतात तरी इच्छुक खेळाडू,युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा.स्पर्धेत प्रत्येक सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र व प्रथम,द्वितीय,तृतीय प्राविण्य प्राप्त संघास व खेळाडूस प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह क्रीडा मंत्रालयाद्वारे देण्यात येईल.तरी मोठ्या प्रमाणात तालुक्यातील युवकांनी सहभाग नोंदवावा स्पर्धा प्रकार पुरुष (युवक) कबड्डी, गोळाफेक,१०० मीटर धावणे.महिला (युवती) खो-खो,गोळा फेक,१०० मीटर धावणे वयाची अट वय वर्ष १५ ते २९ सहभाग कोण घेऊ शकेल शालेय,महाविद्यालयीन,तसेच बाहेरील खेळाडू.केज तालुक्यातील खेळाडूंनी नोंदणी दिनांक ८ जानेवारी २०२५ पर्यंत खालील क्रमांकावर करावी.९९२२५३६३७३ श्री.विनोद गुंड क्रीडा संयोजक केज,९६६५३७४३७९ श्री. सानप सर क्रीडा शिक्षक स्पर्धेचे ठिकाण साने गुरुजी निवासी विद्यालय धारूर रोड केज येथे आहे.तरी केज तालुक्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन अरुण कोचुरे मॅडम नेहरू युवा केंद्र युवा कार्य एवम खेल मंत्रालय भारत सरकार, प्रा.डॉ. कविता गीत्ते,विनोद गुंड क्रीडा संयोजक केज यांनी केले आहे.नाव नोंदणी करतानाखेळाडूंनी आधार कार्ड व जन्म तारखेचा पुरावा देणे आवश्यक आहे.स्पर्धा दिनांक ९ जानेवारी २०२५ वेळ सकाळी नऊ वाजता होणार आहेत. तरी केज तालुक्यातील स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.









Leave a Reply