केज/प्रतिनिधी
जनविकास परिवर्तन आघाडी नगरपंचायत निवडणुकीमध्ये दिलेला वचननामा पुर्ण करत आहे अशी माहिती जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्वेसर्वा हारुणभाई ईनामदार यांनी प्रभाग क्रमांक आठ येथील विकास कामाचे उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.ते केज-कळंब रोड लगत शहरातील प्रभाग क्रमांक आठ मधील रस्ते नाली बांधकाम यांच्यासह विविध विकास कामाचे श्रीफळ फोडून उद्घाटन करत प्रत्यक्षात कामास सुरुवात करण्यात आली आहे.प्रसार माध्यमांशी बोलताना जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारूणभाई इनामदार यांनी सांगितले की,केज नगरपंचायतच्या निवडणुकी च्या वेळी जनविकास परिवर्तन आघाडीच्या जाहीर नाम्याच्या माध्यमातून दिलेले वचन आम्ही आता रोजी पूर्ण करत आहोत व त्या वचनपूर्तीकडे वाटचाल करीत आहोत.
प्रभाग क्रमांक आठ मधील रस्ते,नालीच्या कामासह विविध कामे गेल्या अनेक वर्षापासून अद्यापही झालेली नव्हती या भागामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणावर रहात आहेत.केज नगर पंचायत निवडणुकीच्या वेळी जनविकास परिवर्तन आघाडीने या भागातील नागरिकांना शब्द दिला होता की,केज नगर पंचायतच्या माध्यमातून आमची सत्ता आल्यानंतर आम्ही या भागातील विकास कामे करू. त्याचाच एक भाग म्हणून केज-कळंब रोडवरील हॉटेल लोकसेवा पासून जुन्या चिंचोलीमाळी रस्त्ता व नालीच्या बांधकामासह या भागातील अनेक रस्ते व विविध विकास कामाची श्रीफळ फोडून सुरुवात करण्यात आली आहे.
केज नगरपंचायतच्या माध्यमातून या भागातील विकास कामे मंजूर करून आणून कामास सुरुवात केल्याबद्दल जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड,गटनेते राजूभाई इनामदार,नगरसेवक जलालभाई ईनामदार यांचा या भागातील नागरिकांनी शाल,पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.कामाचा शुभारंभ उपस्थितमान्यवर व या भागातील नागरिक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन प्रत्यक्षात कामास सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना हारुणभाई इनामदार म्हणाले की,आम्ही केज शहराच्या विकास कामासाठी कटिबद्ध आहोत व आमच्या जनविकास परिवर्तन आघाडीने निवडणुकीच्या वेळी दिलेल्या जाहीरनाम्या प्रमाणे आम्ही केज वासियांची सेवा करण्या साठी कटिबद्ध आहोत. येणाऱ्या काळातही या भागातील उर्वरित कामे आम्ही लवकरच मार्गी लावू असे बोलताना हारुणभाई इनामदार यांनी सांगितले आहे.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड म्हणाल्या की,प्रभाग क्रमांक आठ हा गेल्या अनेक दिवसापासून विकास कामापासून वंचित होता परंतु जनविकास परिवर्तन आघाडी च्या माध्यमातून केज नगर पंचायतची सत्ता आमच्या हाती येताच या भागातील अनेक कामे मार्गे लावण्या साठी प्रयत्न केले.या भागात अनेक ठिकाणी रस्ते,नाल्यासह विविध कामे आम्ही पूर्णत्त्वाकडे घेऊन जात आहोत आज रोजी या भागात अनेक कामे पूर्ण झालेले आहेत.
या पुढेही उर्वरित या भागा तील राहिलेले कामे लवकरच पूर्ण करणार आहोत असे त्यांनी उपस्थितांना आश्वासीत केले आहे.यावेळी जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार,नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड,गटनेते राजूभाई इनामदार,नगरसेवक जलालभाई इनामदार,जनविकास सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश भिसे,खाजाभाई तांबोळी,बशीरभाई इनामदार,फिरोज टेलर, रसूल टेलर,फारूक इनामदार,मुजेब पठाण, ॲड.वसिम शेख,नखाते मेजर,सय्यद सलीम, विवेक बनसोड,बप्पा लांडगे,आकिब शेख, जमलोदिन फारुखी, नौशाद शेख यांच्यासह जनविकास परिवर्तन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व या भागातील नागरिक उपस्थित होते.









Leave a Reply