केज/प्रतिनिधी
युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय,भारत सरकार, नेहरू युवा केंद्र,बीड व साने गुरुजी निवासी विद्यालय,केज यांच्या संयुक्त विद्यमाने आज येथील साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित तालुकास्तरीय स्पर्धेचे दि.९ डिसेंबर २०२४ रोजी गुरुवारी सकाळी उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.कविता कराड-गित्ते मॅडम यांनी सांगितले की,आजच्या मोबाईलच्या युगात लहान मुलांना चार भिंतीच्या आत राहुन मुले हे मानसिक,शारिरीक आजारी व चिडचिडा पणाने ग्रस्त होत आहेत. यांना या मानसिक आजारातुन मुक्त करायचे असेल तर प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यांकडे वैयक्तिक लक्ष देणेआवश्यक आहे.त्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजेविद्यार्थ्यांना वैयक्तिक व सांघिक खेळाकडे वळविणे आवश्यक आहे.खेळामुळे शारिरीक मानसिक आरोग्य सुधारले जाते व विद्यार्थी तंदुरुस्त बनतो व शासनाने खेळाडू करिता विविध शासकीय कार्यालयात आरक्षण सुद्धा दिलेले आहे.यामुळे उत्कृष्ट खेळाडूंना शासकीय सेवेत नोकरी सुद्धा मिळते.यामुळे खेळाडूंनी खेळ भावनेने खेळ खेळले पाहिजे असे मार्गदर्शन त्यांनी केले.या तालुकास्तरीय स्पर्धे मध्ये गोळाफेक,१०० मीटर धावणे,खो खो व कबड्डी या स्पर्धेत केज तालुक्यातील मोठ्या संख्येने शाळेने सहभाग नोंदवला या स्पर्धेत विजेते खेळाडू पुढील प्रमाणे गोळाफेक मुले प्रथम चंदनशिव पवनराज प्राणराज,द्वितीय चंदनशिव पृथ्वीराज,तृतीय पठाण रेहान अमजद गोळाफेक मुली प्रथम घुले ऐश्वर्याबप्पाजी, द्वितीय लांडगे वैष्णवी सुखदेव, तृतीय तिडके मयुरी महादेव,१०० मीटर धावणे वैयक्तिक स्पर्धेत मुलात प्रथम राऊत भागवत चंदू,द्वितीय घोरपडे अभिजीत महादेव तृतीय चंदनशिव पृथ्वीराज प्राणराज१०० मीटर धावणे मुली प्रथम केदार अश्विनी राजाभाऊ,द्वितीय नेहरकर पुजा सुनील,तृतीय केंद्रे साक्षी शिवाजी तर सांघिक खेळात खोखो स्पर्धेत प्रथम साने गुरुजी निवासी माध्यमिक विद्यालय,केज,द्वितीय सरस्वती कन्या प्रशाला केज,तृतीय जी.एन.एम. नरसिंग कॉलेज केज,कबड्डी मुले प्रथम जय हनुमान क्रीडा मंडळ,केज.द्वितीय साने गुरुजी निवासी उच्च माध्यमिक विद्यालय,केज.तृतीय साने गुरुजी निवासी माध्यमिक विद्यालय केज यांने पटकाविला आहे. विजेत्या संघास व खेळाडूस प्रमाणपत्र देण्यात आले या प्रसंगी केज तालुका क्रीडा संयोजक श्री.विनोद गुंड, स्वामी विवेकानंद विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्रीकृष्ण नेहरकर सर, सरस्वती कन्या प्रशालेचे जोगदंड सर,रामदास सानप सर,आघाव सर, तोंडसे सर,घुले सर,कांदे मॅडम,डोंगरे मॅडम इत्यादी उपस्थित होते.









Leave a Reply