केज दि.14, प्रतिनिधी, साने गुरुजी निवासी विद्यालय, केज येथे दि.12 व 13 जानेवारी रोजी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळाचे अध्यक्ष श्री.उद्धवराव कराड साहेब यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,ग्रामीण भागातील खेळाडूंना आत चांगले भवितव्य आहे कारण वाढत्या लोकसंख्या मुळे शहरी भागात जमिनीचे काँक्रिटीकरण झाल्याअसल्याने अनेक शाळा महाविद्यालयात मैदानी खेळासाठी मैदानाच उपलब्ध होत नसल्याने शहरी भागातील खेळाडू हे इनडोअर खेळाकडे वळल्याचे दिसत आहे. या ग्रामीण भागातील खेळाडूंनी मैदानी खेळाकडे आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. खो खो सारख्या खेळाचे वर्ल्डकपचे यजमान पद आपल्या देशाला मिळाले या वर्ल्डकप मध्ये केज तालुक्यातील सामान्य घरातील ग्रामीण भागातील खेळाडू भारतीय खो-खो संघाचे नेतृत्व करत आहे हे आपल्या दृष्टीने गौरव आहे. शासन खेळा विषयी अनेक उपक्रम राबवित असुन विद्यार्थ्यांनी याचा पुरेपूर लाभ घेतला पाहिजे खेळामुळे शरिर ही निरोगी राहते खेळ आजच्या काळात फारच आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.या क्रीडा महोत्सवात कबड्डी, खो-खो,लांब उडी, 100 मीटर, 200मीटर, 400 मीटर धावणे, कुस्ती, रस्सीखेच, दोरी वरिल उड्या, रिंग्ज टेन्काइंड, बेसबॉल व सॉफ्टबॉल अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा मध्ये सर्व मुलांनी सहभाग घेण्यासाठी वर्ग शिक्षकांनी प्रोत्साहन दिले. तसेच आपला वर्ग जिंकण्यासाठी मुलांना विद्यार्थ्या सोबत चेअरप करित होते. या क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संकुलाच्या लाडक्या प्राचार्या डॉ. कविता कराड/गित्ते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी उत्साहमध्ये प्रतीसाद दिला स्वतः गित्ते मॅडम यांनी पंच म्हणून यशस्वी कामगिरी बजावली या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक रामदास सानप,चाटे बाबासाहेब, चोले सुदर्शन,दिपाली कांदे, दत्तात्रय घुले, चंपाकला डोंगरे, उत्तम मोती, श्रूती लहाने, मनिषा नागरगोजे, सचिन काळे, कल्पना जोशी, नागनाथ गुजर, ज्ञानेश्वर पवार, सुवर्णा सिरसट, जयदेवी दाजी आदिनी परिश्रम घेतले विजयी स्पर्धकांना शालेय स्तरावर बक्षीस वितरण करण्यात आले.
सोबत :- फोटो









Leave a Reply