*केज येथे प्रोफेशनल क्रिकेट लिगचे आयोजन.*

 

 

केज! प्रतिनिधी

 

प्रोफेशनल क्रिकेट लिग स्पर्धेला दि. १९ रविवार पासून सुरूवात करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. वासुदेव नेहरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विजय स्पोर्ट्स चे संचालक विनोद गुंड, विकास मस्के, पत्रकार विजय आरकडे व सर्व क्रिकेट क्लबचे खेळाडू उपस्थित होते.

या स्पर्धेत, शिक्षक, डॉक्टर, वकील, पोलीस, पत्रकार, इंजिनिअर, व्यापारी, महसूल, व विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या खेळाडूंसाठी या स्पर्धेचे विशेष आयोजन क्रांतीनगर येथील मैदानावर करण्यात आले आहे.

किरण सारूक, स्वप्नील चाटे, करण मस्के, जहीर इनामदार हे या स्पर्धेचे संयोजक आहेत.

या प्रोफेशनल क्रिकेट लिगचे पहीले बक्षीस १०,१११ रू. जन विकास आघाडीचे नेते मा. हारूणभाई इनामदार यांच्याकडून देण्यात येणार आहे तर दुसरे बक्षीस ५,१११ रू. बालरोग तज्ञ डॉ. दिनकर राऊत यांच्या वतीने ठेवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!