लक्ष्मी मुंडे नर्सिंग काॅलेजमध्ये
रविवारी पालक मेळाव्याचे आयोजन
——————————
केज दि.२५ ( प्रतिनिधी ) शहरापासुन जवळच असलेल्या
बीड रोडवरील लक्ष्मी मुंडे नर्सिंग काॅलेजमध्ये दि.२६ जानेवारी रविवार रोजी प्रजासत्ताक दिनानिमीत्त पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती प्राचार्य रवि पवारसर यांनी दिली आहे.
सिध्दीविनायक शैक्षणिक सेवाभावी संस्थेशी सलग्न असलेल्या केज शहरातील लक्ष्मी नर्सिंग काॅलेज मध्ये ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमीत्त दि.२६ जानेवारी रविवार रोजी सकाळी साडेआठ वाजता संस्थापक अध्यक्ष रमाकांत (बापू) मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात येणार आहे.या कार्यक्रमानंतर लक्ष्मी मुंडे नर्सिंग काॅलेजमध्ये पालक मेळाव्याचे आयोजनही करण्यात येणार आहे.या पालक मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी भागवत कथाकार ह.भ.प.केशव शास्त्री महाराज सारुकवाडीकर,श्रीराम कथाकार ह.भ.प.केशव शास्त्री महाराज घुले टाकळीकर,माजी जि.प.सदस्या उषाताई मुंडे या उपस्थित राहणार असल्याची माहीती प्राचार्य रवि पवार सर यांनी दिली आहे.
लक्ष्मी मुंडे नर्सिंग कॉलेज मध्ये रविवारी पालक मेळाव्याचे आयोजन.









Leave a Reply