राजर्षी शाहू विद्यालयात 76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
केज! प्रतिनिधी
भारतीय लोकशाहीचा उत्सव असलेल्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वामी दयानंद प्रतिष्ठान केजच्या राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळेत संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.राहुल राजेसाहेब देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.शाळेत विविध उपक्रम घेत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री.हनुमंत भोसले सर,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चाटे बी.बी.शाळेचे माजी शिक्षक श्री.चौधरी बी.डी.ज्येष्ठ शिक्षक श्री.विष्णू यादव यांच्या सह सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.









Leave a Reply