*स्वानंद सार्वजनिक वाचनालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपन्न.* *मराठी भाषा हि ज्ञानभाषा व जागतिक भाषा झाली पाहिजे – वसुदेव ( बप्पा) गायकवाड*

 

केज/ प्रतिनिधी

सानंद सार्वजनिक वाचनालय, आनंदगांव ता. केज. जि.बीड येथे १४ ते २८ जानेवारी २०२५ या कालावधीत ” मराठी भाषा संवर्धन पंधरवडा “, विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेवून संपन्न झाला.

२८ जानेवारी २0२५ रोजी समारोप कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्ष स्थानी ग्रंथायलयाचे संस्थापक अध्यक्ष, जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक, ख्यातनाम वक्ते व व्याख्याते वसुदेव( बप्पा) गायकवाड हे होते.

प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक छगननाना गायकवाड,ग्रंथालयाचे सहसचिव ज्ञानोबा भोगजकर, दादासाहेब गायकवाड, दत्तात्रय कदम, ग्रामपंचायत सदस्य नारायण गायकवाड, सुरेश भोगसकर, यां ची उपस्थिती होती.

सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय समारोप वसुदेव( बप्पा) गायकवाड यांनी केला.

मराठी भाषा हि ज्ञान भाषा व जागतीक भाषा झाली पाहिजे असे प्रतिपादन वसुदेव( बप्पा) गायकवाड यांनी केले.

केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे, त्यामुळे आता मराठी भाषेच्या विकासासाठी भारत सरकार निधी मोठ्या प्रमाणात देईल, त्यामुळे मराठी साहित्यात मोठी भर पडेल, पण मराठी भाषा हि ज्ञान भाषा व जागतिक भाषा बनली पाहिजे यासाठी मराठी भाषीक म्हणून आपणा सर्व मराठी भाषिकांना जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागेला.

आपल्याला मराठीतले ज्ञान, तत्वज्ञान वृद्धिगत करावे लागेल. मराठी भाषेवर प्रेम करावे लागेल, मराठी भाषेची आस्था आणि अस्मिता जपावी लागेल. नियमीतपणे मराठी भाषिकांना मराठीत बोलावे, लिहावे लागेल. मराठी साहित्यातील ज्ञान ग्रहन करावे लागेल. जास्तीत जास्त मराठी साहित्य वाचावे लागेल, मराठी साहित्याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात करावा लागेल.

मराठी भाषेला ज्ञान भाषेचा स्त्रोत म्हणून पहावे व अनुभवावे लागेल आणि मराठी भाषा हि ज्ञान भाषा व जागतीक भाषा बनली पाहिजे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील असे प्रतिपादन व विनंतीवजा अवाहनही वसुदेव ( बप्पा) गायकवाड यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन, व आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे आनंद( भैय्या ) गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाला बबन पुंड, शाहू वैरागे, बाळासाहेब घोगले, संतोष पुंड, रविंद्र गायकवाड( पेण्टर )., भारत घोगले, दिपक पुरी, ब्रिजलाल गठठानी, डिगांबर नांदे, नारायण गायकवाड, बालाजी गायकवाड, अजय गायकवाड, विशाल गायकवाड, रावसाहेब जाधव, रमेश गायकवाड, कमलाकर साबळे, देविदास गायकवाड, सोहम गायकवाड, श्रुती पुंड, कृष्णा गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने वाचक, ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!