राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळेचे स्नेह संमेलन उत्साहात साजरे.

*राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे…*

*विद्यार्थ्यांनी जिंकली प्रेक्षकांची मने..उपस्थितीतांकडून कौतुकाचा वर्षाव*

केज! प्रतिनिधी

राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळा ही शहरातील नामांकित शाळा आहे.ही शाळा वर्षानुवर्ष संस्कारक्षम पिढी घडविण्याचे कार्य अविरत करीत आहे असे प्रतिपादन केजच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री.दत्तात्रय चाटे यांनी केले.राजर्षी शाहू विद्या मंदिर केज शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ते बोलत होते.
स्वामी दयानंद प्रतिष्ठान केज संचलित राजर्षी शाहू विद्या मंदिर केज शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.विद्यार्थ्यांनी रंगमंचावर आपले कलागुण सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे उद्घघाटन दिप प्रज्वलन व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले.यावेळी कार्यक्रमासाठी अध्यक्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.राजेसाहेब देशमुख,प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री.दत्तात्रय चाटे,केंद्रप्रमुख मा.श्री.संजय चवरे,नगरसेवक मा.श्री.बाळासाहेब गाढवे तर प्रमुख उपस्थितीमध्ये संस्था उपाध्यक्ष मा.श्री.अंकुशराव इंगळे,सचिव मा.श्री.गदळे जी.बी.संचालक मा.श्री.वासुदेव डोंगरे,मा.श्री.जाधव आर.जी.शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चाटे बी.बी.शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक श्री.चौधरी बी.डी.यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम,राष्ट्रीय एकात्मता याबाबतचे गीत व अभिनय सादर करत सामाजिक संदेश दिला.सांस्कृतिक गीतातुन देशात विविध जाती-धर्माचे-पंथाचे लोक राहत असले तरीही राष्ट्रहितासाठी सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे असा संदेश दिला.महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा सांगणारे लोकगीत,लावणी,भक्ती गीत यांनी कार्यक्रम आणखीनच बहारदार केला.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी क्रमिक अभ्यासाबरोबरच विविध स्पर्धा,उपक्रम,सांस्कृतिक कार्यक्रम या गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात.भविष्यातील कलाकाराचा पाया इथेच घातला जातो यासाठी शाळेकडून अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.यादव व्ही.बी.यांनी केले तर आभार श्री.डिरंगे जी.बी.यांनी मानले.सर्वश्री देशमुख ए.डी,क्षीरसागर आर.एस,मस्के जे.आर.श्रीमती गायकवाड ध्वजा,श्रीमती जाधव अनिता यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.उत्कृष्ट नियोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक वृंद यांचे अभिनंदन केले.स्नेहसंमेलनासाठी पालकांची उत्तम उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!