केज ! प्रतिनिधी
*रेणुका माता कृषी विकास प्रतिष्ठान संचलीत विक्रमराव मुंडे पोदार लर्न स्कूल, केज येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.संस्कृती: कलर्स ऑफ इंडिया या वर्षीच्या सोहळ्याची मुख्य संकल्पना होती.ज्यामध्ये भारताच्या विविध संस्कृती आणि परंपरेचा उत्सव साजरा करण्यात आला आहे.*
केज शहरातील विक्रमराव मुंडे पोदार लर्न स्कूल येथे शनिवारी सायंकाळी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.संस्थेचे अध्यक्ष विक्रम (बप्पा) मुंडे व सौ.कृष्णाबाई विक्रमराव मुंडे यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून स्नेहसंमेलनाचा शुभारंभ करण्यात आला.त्यानंतर शाळेच्या प्राचार्या सौ. अभिलाषा सारंगदेवोत यांनी उपस्थितांचे स्वागत करत विविधतेतील एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित केले.या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे देशभरातील सांस्कृतिक परंपरांचे नयनरम्य सादरीकरण,जिथे विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र,राजस्थान,गुजरात, पंजाब,हरियाणा,केरळ,तामिळनाडू, पश्चिम बंगाल,हिमाचल प्रदेश आणि काश्मीर या राज्यांतील नृत्य आणि संस्कृतीचे सजीव दर्शन घडवले.विद्यार्थ्यांच्या आकर्षक वेशभूषा, जोशपूर्ण सादरीकरण आणि तालबद्ध नृत्यांनी संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले होते.
प्रसंगी श्री.महेशजी वाली,(न्यायाधीश, धारूर न्यायालय),श्रीमती.सिताताई बनसोड (नगराध्यक्षा,केज) श्री.हरूनभाई इनामदार (जनवीकास प.आ.केज, श्री.प्रवीणजी देशपांडे (संचालक वैद्यनाथ बँक,परळी वै.) श्री.महेश इटकर,सर (संस्थापक,योगेश्वरी कॉलेज ऑफ बी.एस्सी.नर्सिंग),श्री.डि.एल.नागरगोजे (आदर्श शिक्षक),श्री.पी.डी.मुरकुटे (निवृत्त प्राचार्य), श्री.महादेव अप्पा चौरे (विराल डेअरी केज),श्री.राऊत,सर(एम.आय.टी.अंबाजोगाई), श्री.मधुरजी मुंडे,श्री.रत्नदीप चाटे, श्री.ओमशेट रांजनकर,श्री.ॲड.वरून शिंदे पाटील,श्री.रामकृष्ण काका घुले,श्री.निमेश चिद्रवर सर,डॉ.संजय पुजडेकर,डॉ.स्वरूप डुबे यांनी सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नाट्य व नृत्याचे कौतुक केले.
दरम्यान कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरला ‘भारत मातेची विविध राज्यांमध्ये यात्रा’हा नाट्यप्रयोग.या नाटकाद्वारे विद्यार्थ्यांनी भारत मातेच्या प्रवासाची कथा प्रभावीपणे मांडली,जी विविधतेतील एकतेचा संदेश देणारी ठरली. विद्यार्थ्यांच्या जोशपूर्ण अभिनयाने उपस्थितांना भारावून टाकले होते.
कार्यक्रमामध्ये पोदार जंबो किड्स आणि पोदार लर्न स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला,ज्यामुळे त्यांच्यात राष्ट्रभावना आणि सांस्कृतिक विविधतेबद्दल आत्मीयता निर्माण झाल्याचे प्रतिपादन श्री.विजयकांत मुंडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली आणि उपस्थितांनी एक अविस्मरणीय अनुभव मिळवल्याचा आनंद व्यक्त केला.
विक्रमराव मुंडे पोदार लर्न स्कूल,केजने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देत राष्ट्रप्रेम आणि संस्कृतीचा वारसा जपण्याचे महत्त्व अधोरेखित केल्याचे मनोगत प्रा.माधुरीताई मुंडे यांनी व्यक्त केले.
यावेळी शाळेच्या प्राचार्या अभिलाषा सारंगदेवोत मॅडम तसेच मुख्याध्यापीका सौ.राधा भन्साळी मॅडम यांच्यासह अविनाश शिलवंत सर, राजु शेळके सर, धनंजय मस्के सर, अमर शिंदे सर, सुहास काळे सर, शुभांगी सगरे मॅडम, रत्तगीता पाटील मॅडम, शिला घोळवे मॅडम, मेघा मोरे मॅडम, अश्विनी गलांडे मॅडम, सुमय्या अत्तार मॅडम, असराबाई अंकुरवाड मॅडम, दिपाली राजमाने मॅडम, तेजश्री सगरे मॅडम, झीनत शेख मॅडम, कविता वाघमोडे मॅडम, सविता ओव्हाळ मॅडम, शितल दवणे मॅडम, अश्विनी मगर मॅडम, प्रणिता वाघमारे मॅडम, अंजुम शेख मॅडम,शिक्षकेत्तर कर्मचारी गणेश काळे, शरद चवरे, अदिती पाटिल मॅडम, अनिकेत पाटील, शिपाई दिपक सुकाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती…









Leave a Reply