*नाईक सुभेदार बालाजी इंगळे यांचा सेवापूर्ती सन्मान माजी सैनिकांच्या सहवासातून देशप्रेमाची भावना वाढीस लागेल—-डॉ हनुमंत सौदागर*

 

केज दि ६(प्रतिनिधी)
तालुक्यातील कळंबआंबा येथील भूमिपुत्र बालाजी बब्रूवान इंगळे हे भारतीय सैन्यदलातून नाईक सुभेदार पदावर काम करून २४ व्या वर्षाची सेवा करून सेवानिवृत्त झाले.याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने दि २ रोजी सकाळी मिरवणूक काढून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मेजर जगन्नाथ कदम,
प्रमुख पाहुणे डॉ हनुमंत सौदागर,सरपंच शशिकांत इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
गावकऱ्यांच्या वतीने नाईक सुभेदार बालाजी इंगळे यांची
गावभर वाजत गाजत मिरवणूक काढली गावकऱ्यांच्या वतीने सहकुटुंब नागरी सत्कार करण्यात आला.
मिरवणुकीत भारत माता की जय वंदे मातरम या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
यावेळी बोलताना डॉ हनुमंत सौदागर म्हणाले, सैनिक देशाच्या सीमेवर रक्षण करतात म्हणून आपण घरात सुरक्षित आहोत. जय जवान जय किसान हाच नारा देशाच्या समृद्धीसाठी महत्त्वाचा आहे.
सैनिकांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांचा कायम सन्मान झाला पाहिजे. असे मत व्यक्त केले
सत्कारमूर्ती बालाजी इंगळे यांनी यापुढे समाजसेवेसाठी तत्पर राहील असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी सैनिक संघटना विविध पदाधिकारी यांच्या हस्ते हे सेवापूर्ती गौरव निमित्ताने बालाजी इंगळे यांचा सत्कार करण्यात आला.

सोबत फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!