मी येडेश्वरीला नव्हे तर कर्नाटक ला गेलो होतो, मुकादमा चा लेखी जवाब.

मी येडेश्वरीला नव्हे तर कर्नाटकला गेलो होतो; मुकादमाचा लेखी जबाब

बीड: मी येडेश्वरी शुगर मिल लि. या साखर कारखाण्याची मुकादमी करून कुटुंबाची उपजिवीका भागवतो. दरम्यान, मी कारखाना कर्मचाऱ्यासोबत कामनिमित्त कर्नाटक येथे गेलो होतो. परंतु, माझ्या मुलीला हे माहीत नसल्याने तिचा गैरसमज झाला. त्यामुळे ती पोलिस ठाण्यात गेली. त्यामुळे माझी येडेश्वरी कारखान्याबाबत कसलीही तक्रार नाही, असा लेखी जबाब मुकादम किसन सर्वे यांनी दिला आहे

जबाबात म्हटले आहे, मी किसन भानुदास सुर्वे, वय 32 वर्ष, व्यवसाय मुकादाम, रा.सुर्याचीवाडी, समक्ष पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे विचारले वरून सांगतो, मी येडेश्वरी शुगर मिल लि.या साखर कारखाण्याची मुकादमी करून कुटुंबाची उपजिवीका भागवतो. दि.07 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता माझे मेव्हणे सदाशीव सातेराम चव्हाण यांच्यासोबत कर्नाटक येथील मुकादम आयुब हबीब शेख यांच्याकडे येडेश्वरी साखर कारखाना यांची बाकी असल्याने येडेश्वरी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांसोबत कर्नाटक येथे गेलो होतो. कर्नाटक येथे जात असल्याबाबत घरच्यांना सांगीतले नव्हते. मुकादम आयुब हबीब शेख यास धोधण्यासाठी माझा एक दिवस उलटला. मी दि. 9 फेब्रुवारी रोजी बीड येथे परत आल्यावर मला गावातील लोकांनी सांगीतले मी शितल सदाशिव चव्हाण ही पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे तक्रार देण्यासाठी गेली आहे. सबब मी व मेव्हणे लागलीच ३ वाजता पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे येऊन मी कर्नाटक येथे गेलो असल्याने शितल हीस सांगीतले. मी स्वखुशीन येडेश्वरी शुगर मिल लि. यांच्या कर्मचाऱ्यासोबत कर्नाटक येथे गेलो होतो. यामुळे माझी कोणाविरुध्द काही एक तक्रार नाही, असे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!