*होळ येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खो-खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळेचा सत्कार*

 

 

प्रतिनिधी | केज

तालुक्यातील होळ येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत व्यवस्थापक राहुल सावंत यांनी भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळे हिचा गुरुवारी (दि.६) सत्कार केला.

 

प्रियंका इंगळे भारताला पहिला खो-खो वर्ल्ड कप जिंकून दिला आहे. त्याबद्दल तिचा ठिकठिकाणी सन्मान केला जात आहे. होळ येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत देखील सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते नेताजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदवीधर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, होळ येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक राहुल सावंत, होळेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक देवानंद मलदोडे, पाटोदा अंबा शाखेचे व्यवस्थापक प्रीतम गिरीगोसावी, मोरेवाडी शाखेचे व्यवस्थापक तोसिफ शेख, आडसचे शाखा व्यवस्थापक सचिन गोहोकर, सहायक शाखा व्यवस्थापक ज्ञानेश्वर बिराजदार, लिपिक पल्लवी गवांडे, सटवा मेंढके, दत्तु इंगळे, हनुमंत इंगळे, भगीरथ इंगळे यांच्यासह इंगळे कुटुंबीय, ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!