केज (प्रतिनिधी)
ध्येय निश्चित केल्याच यश प्राप्ती होते. आई वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत
असे मत डॉ हनुमंत सौदागर यांनी व्यक्त केले ते नायगाव येथील संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते
कार्यक्रमाचे अध्यक्ष सहशिक्षक माधव गायकवाड,प्रमुख उपस्थिती
मुख्याध्यापक कावळे एल डी, छात्र मुख्याध्यापक सौरभ खोडसे,सहशिक्षक श्री सोमवंशी, श्री राऊत, श्री वाघमारे, संतोष अडसूळ, गोविंद कुडके, आदींची होती
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री राऊत यांनी करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
पुढे बोलतांना म्हणाले
कॉपी पासून दूर राहा.शिक्षणाचा उपयोग व्यवहारीक जीवनामध्ये केला पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाशी आपला संबंध जोडलेला असतो. शिक्षण घेत असताना आपण सर्वप्रथम आपला मार्ग शोधला पाहिजे तरच आपल्याला ते ध्येय साकार करता येईल. विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांशी प्रमाणिक राहून अभ्यास करावा यामुळे आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करता येईल असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी ऋतुजा सोमवंशी वैष्णवी गुजर यांनी केले कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
सोबत फोटो









Leave a Reply