जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही.डॉ- दिनकरराव राऊत.
केज!प्रतिनिधी
केज तालुक्यातील कानेश्वर विद्यालय , कानडी माळी या विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा ” निरोप समारंभ ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक संतोषराव गरडे कानेश्वर विद्यालय , कानडी माळी प्रमुख पाहुणे बालरोग तज्ज्ञ डॉ.दिनकरराव राऊत – योगिता बाल रुग्णालय , केज सरपंच अशोकराव राऊत ग्रामपंचायत कार्यालय , कानडी माळी पोलिस पाटील लक्ष्मणराव राऊत कानडी माळी हे होते .
या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले .
यावेळी डॉ.दिनकररा राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असे म्हटले की , आपल्याला आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी शिक्षण घेणे आवश्यक आहे थोर समाजसुधारक , थोर राष्ट्रपुरुष यांनी केलेल्या कार्याची माहिती घेतली पाहिजे स्वतःच अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कष्ट सहन केले पाहिजे आपण वाईट गोष्टीपासून दूर असलं पाहिजे चांगले विचार आत्मसात केले पाहिजेत तरच आपण आपल्या आयुष्यात काही तरी करून दाखवू शकतो हे लक्षात ठेवले पाहिजे .तसेच सरपंच अशोकराव राऊत यांनीही या वेळी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले , आपण शिक्षण घेत असताना काही अडचणी येत असतात . पण त्यावर मात करून पुढे गेले पाहिजे तरच आपण आपल्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो . त्यासाठी मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे .
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक संतोषराव गरडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले तुम्ही परिक्षेला समोरे जात आहात . त्यावेळी कसल्याही प्रकारची भिती मनामध्ये ठेवायची नाही . जास्तीत जास्त गुण घेऊन उत्तीर्ण व्हायचे आणि कानेश्वर विद्यालयाचे नाव . तुमचं नाव उज्ज्वल करण्याचे काम करायचे .
या वेळी आदर्श शिक्षक अनंतराव गवळी , अरूण गिते , आदर्श शिक्षक नरहरी काकडे , सिद्धार्थ राऊत , आत्माराम राऊत हत्यादी कर्मचारी सहकारी उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी बहिरे यांनी तर आभार श्रावणी राऊत यांनी मानले .









Leave a Reply